इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

हुंडाबळी रोखण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकांकडून प्रयत्न आवश्यक पोलीस अधीक्षक जाधव यांचे प्रतिपादन

         कोल्हापूर दि. २८ : हुंडाबळी रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपल्यापरीने योगदान देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी केले.
         जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातर्फे हुंडाबंदी दिन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी श्री.  जाधव बोलत होते.  येथील श्री. शाहू छत्रपती महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला.
         श्री. जाधव म्हणाले, हुंडा घेणे-देणे ही अनिष्ठ प्रथा आहे. या प्रथेचं उच्चाटन करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेच. पण यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देण्याची आवश्यकता आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
           अध्यक्षस्थानी श्री. शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्गकांत बोंद्गे होते. त्यांनी प्रगती आणि विकास साधायचा असेल तर महिलांना समान संधी देण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. यावळी प्रा. डॉ. सविता रासम यांचे महिला विषयक कायदे आणि गिरीष लाड यांचे स्त्रीभ्रृण हत्त्या, लिंगभेद या विषयावर भाषणे झाली.
         यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय माने, शिवाजी विद्यापीठातील लोक विकास केंद्गाच्या संचालक डॉ. मंजुषा देशपांडे, उपप्राचार्य एन. व्ही. शहा, मॅग्नम ओपस्‌चे राहुल इंग्रोळे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.