कोल्हापूर दि. २१ : कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर बांधकाम व साहित्य पुरवठ्याची कामे ई-निविदा कार्यप्रणाली प्रक्रियेतून अवलंबिण्यात येणार आहेत. शासनामार्फत विविध विकासात्मक कामे, सेवा, वस्तुंची खरेदी यासाठी निधी खर्च करताना निविदा प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो. सदरच्या प्रचलित पध्दतीमध्ये बदल करुन बांधकामे, साहित्य व सेवा पुरवठा अशा विविध बाबींची कामे वाटप करतांना तसेच वस्तुंचा व सेवांचा पुरवठा करुन घेताना अवलंबावयाच्या प्रक्रियेत सुटसुटीतपणा व जास्तीत जास्त पारदर्शीपणा असावा यासाठी ई-टेंडरिंग पध्दतीचा अवलंब करावयाचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१२ पासून ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयात ई-टेंडरिंग कार्यप्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे.
ज्या वस्तु/साहित्य व सेवा पुरवठ्यासाठी शासन दर करार निश्चित नाहीत त्या प्रत्येक वस्तुंची खरेदी करताना रक्कम रुपये एक लाखापेक्षा जास्त अशी कोणतीही वस्तु/साहित्य व सेवा पुरवठ्याची खरेदी ई-टेंडर माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर रुपये पाच लाख व त्यापेक्षा अधिक मुल्यांची सर्व कामे पहिल्या टप्प्यात ई-टेंडरच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत ग्रामपंचायत स्वतः मजूर लावून व साहित्य खरेदी करुन काम करणार असल्यास ई-टेंडर माध्यमातून काम देण्याची प्रश्न नाही, मात्र एक लाख रुपयावरील साहित्य खरेदी करताना मात्र ई-टेंडरच्या माध्यमातून करणे अनिवार्य राहील. ई-निविदेचा अवलंब करण्यासाठी इच्छुक कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर सहकारी संस्था व पुरवठादार यांचे रजिस्ट्रेशन व सही ई सिग्नेचरची नोंदणी दि. ३१ डिसेंबर २०११ पूर्वी करुन घेणे आवश्यक आहे. ई-टेंडर कार्य प्रणालीबाबत जिल्हा परिषद स्तरावर दि. ३० नोव्हेंबर २०११ रोजी इच्छूक कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर सहकारी संस्था व पुरवठादार व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकार्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.