सोमवार, १ जून, २०२०

चला वाढवूया... रोग प्रतिकारक शक्ती माहिती कार्यालयात आर्सेनिक अल्बमचे वाटप



       
कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स, महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्सच्या सहाय्याने आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिकेच्या माध्यमातून ‘चला वाढवूया रोगप्रतिकारक शक्ती’ ही मोहीम सुरू केली आहे. जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम-30 सी या होमिओपॅथी औषधाचे वाटप करण्यात आले.
       यावेळी पत्रकार राजा मकोटे, बाबासाहेब खाडे, सचिन पायमल, अजित आयरेकर यांनी याचे वाटप केले. आमदार चंद्रकांत जाधव यांनी महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, आशा वर्कर, स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट यांच्या माध्यमातून 35 हजार कुटूंबांना आर्सेनिक अल्बम 30 सी या होमिओपॅथी औषधांबरोबर माहिती पत्रकाचेही वाटप केले असल्याचे श्री. पायमल आणि श्री. मकोटे यांनी सांगितले.

80 गोळ्या असणारी बॉटल सर्व कुटूंबासाठी
   औषध कसे घ्यावे-
            रोज सकाळी उपाशीपोटी चार गोळ्या. सलग 3 दिवस घेणे, बॉटलच्या झाकणातच 4 गोळ्या टाकणे व जीभेवर टाकून चघळणे. हाच डोस परत बरोबर एका महिन्यांनी परत घेणे म्हणजेच रोज सकाळी उपाशी पोटी चार गोळ्या.. सलग 3 दिवस घेणे. 3 वर्षापर्यंतच्या मुलाला 2 गोळ्या देणे. कोणाचे कोणत्याही आजाराची औषधे चालू असतील तरी त्यांनी हे औषध घेतले तरी चालते.
   पथ्य
         औषधे ज्या दिवशी घेत आहात त्या दिवशी कच्चा कांदा, लसूण खाऊ नये व कॉफी घेऊ       नये. (भाजीतील कांदा, लसूण चालेल)


00000




             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.