कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक
कार्यालये टप्प्या-टप्प्याने सुरू होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात
येणारे कर्मचारी आणि अभ्यागतांचे थर्मल स्कॅनिंग, मास्क आणि सामाजिक अंतर यासह
अन्य गोष्टी अनिवार्य असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व कार्यालय
प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे
यांनी केले आहे.
नजिकच्या काळात
कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची आणि अभ्यागतांची वर्दळ वाढण्याची शक्यता गृहित धरून कोव्हिड-19
चा प्रसार होऊ नये यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या
पुढीलप्रमाणे आहेत.
1) कार्यालयात
प्रवेश करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे व अभ्यागतांचे तापमान दररोज थर्मल
स्कॅनर/इन्फ्रारेड थर्मामीटरने तपासावे, या थर्मल स्कॅनर/ इन्फ्रारेड
थर्मामीटरमध्ये योग्य तापमानाची नोंद होत आहे किंवा नाही याची रोज खात्री करावी.2)
हवा खेळती राहण्याकरिता कार्यालयातील सर्व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. 3)कार्यालयातील
सर्व कर्मचाऱ्यांनी किमान 3 पदरी मास्क (ट्रिपल लेयर मास्क/सर्जिकल मास्क) संपूर्ण
कार्यालयीन वेळेमध्ये वापरावा.4) कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
जंतुसंसर्ग टाळण्यासाठी आपल्या नाकाला, डोळ्यांना तसेच तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे.5)
जर खोकला, सर्दी असेल तर टिशू पेपरचा किंवा रूमालाचा वापर करावा. रूमाल स्वच्छ व
धुतलेला असावा. रूमाल दररोज धुवून स्वच्छ करावा. शिंकताना व खोकतांना रूमालाचा
वापर अवश्य करावा. टिशू पेपरचा वापर झाल्यानंतर त्वरित बंद कचरा पेटीत टाकावा व
हात स्वच्छ धुवून घ्यावेत.6) कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये अंतर किमान 3 फूट
असावे. आवश्यक असल्यास बैठक व्यवस्थेची फेररचना करावी.7) कार्यालयात प्रवेश
करणाऱ्या सर्व अभ्यागतांनी सदैव मास्क घालणे अनिवार्य आहे. 8) कार्यालयाच्या
प्रवेशव्दाराजवळच सॅनिटायझरची तसेच प्रत्येक स्वच्छतागृहात साबण/हॅडवॉशची व्यवस्था
करावी. 9) सर्वांनी
आपले हात कमीतकमी 20 सेंकदाकरिता साबणाने स्वच्छ धुवावेत. प्रत्येक दोन तासांनी
तसेच स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत. 10) वारंवार वापरण्यात येणाऱ्या वस्तू उदा.
लिफ्टमधील बटन,बेल, टेबल,खुर्च्या व इतर कार्यालयातील उपकरणे 2 टक्के सोडियम
हायपोक्लोराइट सोल्युशनने दिवसातून तीन वेळा स्वच्छ पुसून घ्यावी. 11) कार्यालयातील सर्व कम्प्युटर,प्रिंटर,
स्कॅनर दिवसातून दोन वेळा स्वच्छ पुसून घ्यावेत. या वस्तूंचे निर्जंतुकीकरण 70
टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने करण्यात यावे. 12) कार्यालय साबण व पाण्याने नियमीतपणे धुवून
घ्यावे. हे करताना सफाई कामगाराने ग्लोव्हज, रबर बुट व ट्रिपल मास्कचा वापर करावा
व काम झाल्यास त्वरित सर्व काढून त्वरित जैव वैद्यकीय कचराच्या नियमानुसार
विल्हेवाट लावावी व हात स्वच्छ धुवून घ्यावेत. 13) कोव्हिडचा संसर्ग रोखण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दर्शनीय स्थळांवर
लावाव्यात.
कर्मचारी /अधिकारी यांच्याकरिता सर्वसाधारण
सूचना :-
एकाच
वाहनामधून अनेक अधिकारी/कर्मचारी यांनी प्रवास करू नये. e-office चा जास्तीत-जास्त
वापर करावा व फाईल्स ई-मेल व्दारे पाठवाव्यात. कमीत-कमी अभ्यागतांना कार्यालयात
प्रवेश द्यावा. कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांचे तापमान थर्मल स्कॅनरने
तपासण्याबाबतच्या सूचना निर्गमित कराव्यात. या काळामध्ये कार्यालयीन बैठकांसाठी
अधिकारी/कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष बोलावू नये. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सचा वापर
करावा. कार्यालयात अधिकारी/कर्मचारी यांनी एकत्र बसणे, डबा खाणे किंवा एका ठिकाणी
जमा होणे टाळावे व त्याकरिता त्वरित आदेश निर्गमित करावेत. एकच काम अनेक
व्यक्तींनी करणे आवश्यक असल्यास 2-3 व्यक्तीचे लहान गट करावेत यामुळे कर्मचाऱ्यांस
जंतुसंसर्ग झाला तरी फक्त त्यांच्या गटाचे अलगीकरण होईल.
कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना कोव्हिड
संसर्ग झाल्यास :-
कोणत्याही
अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांस ताप 100.4 डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त ताप ,
खोकला,दम लागत असल्यास तात्काळ रूग्णालयात भरती करावे. कोव्हिड अहवाल पॉझीटिव्ह
असल्यास संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना पुढील 14 दिवस कार्यालयात येऊ देऊ नये.
अलगीकरणाबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी.
कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यास कॉन्टक्ट ट्रेसिंग करून हाय रिस्क व लो रिस्क
कॉन्टक्ट ची यादी करावी. अहवाल पॉझीटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांशी 3 फूटांपेक्षा कमी
अंतर ठेवून 15 मिनीटांपेक्षा जास्त संपर्क आलेल्या सर्व कर्मचारी/ अधिकाऱ्यांचे
हाय रिस्क असे वर्गीकरण करावे. कार्यालायच्या हॉल/ खोलीमधील इतर व्यक्ती,
कार्यालयीन कामासाठी 3 फूटांपेक्षा जास्त अंतरावरून संपर्कात आलेल्या व्यक्तीचे लो
रिस्क असे वर्गीकरण करावे. हाय रिस्क वर्गीकरण केलेल्या कर्मचाऱ्यांनी जर मास्कचा
वापर केला असेल व अन्य मार्गदर्शक सूचनांचे पालन केले असेल तर त्यांनी नियमीतपणे
कार्यालयीन कामकाज करावे जर संबंधितांनी मास्कचा वापर केला नसेल तर त्यांना पुढील
14 दिवस त्यांच्या घरी क्वॉरंटाईन करावे व त्यांना घरून शासकीय कामकाज करण्याच्या
सूचना द्याव्यात. अशा कर्मचाऱ्यांना ताप, खोकला, थकवा, धाप लागणे इ. लक्षणे
आढळल्यास त्वरित दवाखान्यातील अलगीकरण कक्षात दाखल करण्यात यावे. जर कार्यालयात
कोव्हिड पॉझीटिव्ह कर्मचारी/ अधिकारी आढळले तर या व्यक्तीची दिनचर्या व काम करीत
असलेले क्षेत्र पाहून या इमारत किंवा त्या इमारतीच्या ती विंग किंवा तो मजला,
मार्गदर्शक सूचनांनुसार निर्जंतुक करावेत. निर्जंतुकीकरणानंतर कार्यालयाचे काम
पुन: सुरू करावे.
निर्जंतुकीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना -
निर्जंतुकीकरण
करण्यासाठी फरशी पुसताना तीन बादल्यांचा उपयोग करावा. एका बादलीमध्ये पाणी व
डिटर्जंन्ट, दुसऱ्यामध्ये स्वच्छ पाणी आणि तिसऱ्या बादलीमध्ये निर्जंतुकीकरण
करण्याकरिता 1 टक्के सोडियम हायपोक्लोराईटचे द्रावण घ्यावे. फरशी प्रथम डिटर्जंन्ट
असलेल्या पाण्याने स्वच्छ करावी. पुसलेलं कापड दुसऱ्या बादलीमधील असलेल्या
पाण्याने स्वच्छ करून घ्यावे आणि ते कापड तिसऱ्या बादलीत असलेल्या 1 टक्के
हायपोक्लोराईटच्या द्रावणामध्ये बुडवून त्याने पुन्हा एकदा फरशी पुसून घ्यावी.
फरशी पुसताना एकाच दिशेने आतून बाहेरील बाजू पुसण्यात यावी. दरवाजा, खिडक्या,
लिफ्ट इ. सोडियम हायपोक्लोराईटचे 1 टक्के ने पुसून घ्याव्यात. कॉम्प्युटर,प्रिंटर,
कि-बोर्ड, माऊस, स्कॅनर इ. इलेक्ट्रॉनिक वस्तु 70 टक्के अल्कोहोल असलेले
सॅनिटायझरने पुसून घ्याव्यात. कार्यालयीन शौचालये दिवसातून तीन वेळा सोडियम
कायपोक्लोराईट 1 टक्के किंवा डिटर्जंट चा वापर करून स्वच्छ ठेवावीत. जर एकाच वेळी
5 किंवा त्यापेक्षा जास्त रूग्ण आढळून आले तर हायड्रोजन पॅरॉक्साईड चा वापर करून
या भागात फॉगिंग करून 24 तासानंतर इमारतीचा वापर सुरू करण्यात यावा.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.