कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुला/मुलींचे वसतीगृह,
महासैनिक दरबार हॉल व लॉनकरिता वसतीगृह अधीक्षक, सफाई कामगार व पहारेकरी ही पदे तात्पुरत्या
स्वरूपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज दि. 9 एप्रिल
पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी निवृत्त कर्नल प्रदीप ढोले यांनी केले आहे.
ही पदे कंत्राटी पध्दतीचे व एकत्रित मानधनावर असून
माजी सैनिक/माजी सैनिक विधवांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. वसतीगृह अधीक्षक पदासाठी
उमेदवार सैन्य सेवेत जे.सी.ओ. रँकचा असावा. सफाई कामगार पदासाठी स्त्री/पुरूष व
पहारेकरी पदासाठी पुरूष उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र. 0231-2665812 वर
संपर्क साधावा.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.