इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १ डिसेंबर, २०११

अन्न पदार्थ व्यावसायिकांना परवाना घेण्याचे आवाहन

           कोल्हापूर दि. १ : संपूर्ण देशात ५ ऑगस्ट २०११ पासून अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६ व नियम २०११ लागू झाला आहे. या कायद्यात विविध सात प्रकारचे अन्न पदार्थांविषयीचे कायदे विलीन करण्यात आले आहेत. त्यानुसार विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी परवाना घेणे किंवा नोंदणी करणे बंधनकारक आहे. जुन्या कायद्यानुसार परवाना घेतलेल्या महानगरपालिका क्षेत्रातील व संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांनी सदर परवान्याचे नूतनीकरण किंवा नवीन परवान्यात रुपांतर ३१ डिसेंबर २०११ पर्यंत करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यामध्ये खालीलप्रमाणे विविध ठिकाणी परवाना नोंदणी शिबीर आयोजित केलेले आहेत, नूतनीकरणासाठी सध्या फक्त जुना अन्न परवाना (मूळ परवाना व नूतनीकरण परवाना) हमीपत्र, ओळखीबाबत पुरावा (पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/आधार कार्ड झेरॉक्स प्रत) रेशनकार्ड झेराक्स प्रत आणि नवीन कायद्यानुसार फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व अन्न पदार्थ उत्पादक विक्रेत्यांनी ३१ डिसेंबर २०११ पर्यंत नूतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पदावधित अधिकारी आणि परवाना प्राधिकारी अन्न व औषध प्रशासन यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.