मंगळवार, २ जून, २०२०

कोयनेतून 2100 तर राधानगरीतून 800 क्युसेक विसर्ग




          कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 38.95 दलघमी पाणीसाठा आहे. धरणाच्या विद्युत विमोचकातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणामधून आज सकाळी 7 वाजता 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 46.66 दलघमी, वारणा 324.35 दलघमी, दूधगंगा 212.58 दलघमी, कासारी 21.38 दलघमी, कडवी 30.20 दलघमी, कुंभी 27.05 दलघमी, पाटगाव 22.70 दलघमी, चिकोत्रा 13.87 दलघमी, चित्री 13.05 दलघमी, जंगमहट्टी 9.21 दलघमी, घटप्रभा  14.56 दलघमी, जांबरे 6.06 दलघमी, कोदे (ल पा) 1.38 दलघमी असा आहे.
            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 11.8 फूट, सुर्वे 12.6 फूट, रुई 38 फूट, तेरवाड 32 फूट, शिरोळ 26.3 फूट, नृसिंहवाडी 18 फूट, राजापूर 11.6 फूट तर नजीकच्या सांगली 5 फूट व अंकली 5.7  फूट अशी आहे.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.