कोल्हापूर,दि.
1 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन
कार्यालयामध्ये कच्चे लायसन्स व पक्के लायसन्स वगळता इतर कामकाज टप्प्याटप्प्याने
सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस
यांनी दिली.
आरटीओ
कार्यालयात कच्चे लायसन्स व पक्के लायसन्स वगळता इतर कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू
करण्याचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाले असून नवीन वाहन नोंदणी यापूर्वीच सुरू
करण्यात आली होती. आता वाहन योग्यता प्रमाणपत्र, वाहन हस्तांतरण, बोजा उतरवणे,
वाहन ना हरकत प्रमाणपत्र, दुय्यम लायसन्स पत्ता बदलणे इत्यादी बाबीही सुरू करण्यात
आल्या आहेत. योग्यता प्रमाणपत्रासाठी ऑटो रिक्षा 18, डिलिवरी व्हॅन 10, हेवी
व्हेइकल्स 30, लाईट गुड्स 10, टुरिस्ट 2 असा कोटा ठरविण्यात आला आहे. डुप्लिकेट
लायसन व इतर कामकाज 100 कोटा आहे. यामध्ये लर्निंग लायसन्स व पक्के लायसन्स बंद
आहे. वाहन हस्तांतरण, बोजा उतरवणे, ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी बाबींसाठी 100 असा
कोटा निश्चित करण्यात आला आहे. कार्यालयाचे कामकाज ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार होणार
आहे. वाहनासंबंधी ऑनलाइन अपॉइंटमेंट www.parivahan.gov.in/vahan व
अनुज्ञप्तीसाठी www.parivahan.gov.in/sarathi या लिंक वर घ्यावी.
कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयात घ्यावयाची काळजी याबाबत बोर्ड लावण्यात आले असून
कार्यालयात प्रवेशासाठी फक्त एकच प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले आहे. कार्यालयातील
पार्किंगचा वापर सद्यस्थितीत बाहेरील व्यक्तीस करता येणार नाही. प्रवेश करताना
स्वयंचलित हॅन्ड सॅनिटायझर ने हात धुऊन, मास्क परिधान करून, प्रवेशद्वारावरील
कर्मचाऱ्याकडून थर्मल स्कॅनिंग करून घेवूनच प्रवेश करावा. सामाजिक अंतर पाळावे,
गर्दी करू नये, अन्यथा, कामकाज बंद करावे लागेल, असेही डॉ. स्टीव्हन अल्वारिस
यांनी स्पष्ट केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.