शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

10 वी उत्तीर्ण व 11 वी ला ए ग्रुप सायन्स विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम

 

 


कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय): शिवाजी तंत्र विद्यालय केंद्र या संस्थेत इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या व इयत्ता 11 वी ला ए ग्रुप घेऊन सायन्स विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 200 गुणांचे द्विलक्षी (बायफोकल) व्यवसायात इलेक्ट्रीकल मेन्टेंनन्स, मेकॅनिकल मेन्टेंनन्स, स्कुटर मोटर सायकल सर्व्हिसिंग, इलेक्ट्रॉनिक्स हे अभ्यासक्रम शिकविले जात असल्याचे शिवाजी तंत्र विद्यालय केंद्र तथा औद्योगिक शाळेचे मुख्याध्यापक व्ही. व्ही. राजगुरु यांनी कळविले आहे.

विषयांतर्गत 120 गुणांचे टर्म वर्क व प्रात्याक्षिक असून 80 गुणांचा सैध्दांतिक भाग असतो. त्यामुळे या व्यवसाय गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त आहेत. व्यवसाय विषय मराठी व भुगोल या विषयांना वैकल्पिक असून अभियांत्रिकी शाखेकडे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होतो.

विषयांसाठी या संस्थेशी मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भवानी मंडप, राजर्षी शाहू महाराज व ज्युनिअर कॉलेज, जुना बुधवार पेठ, प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, खासबागजवळ, कोल्हापूर हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, खरी कॉर्नर, श्री. हणमंतराव चाटे ज्युनिअर कॉलेज, शाहूपुरी, विमला गोएंका ज्युनिअर कॉलेज, पेटाळा ही कनिष्ठ महाविद्यालये संलग्न आहेत.

ए ग्रुप घेऊन इयत्ता 11 वी सायन्सला प्रवेशच्छूक विद्यार्थ्यांनी या पैकी कोणताही एक द्विलक्षी विषय निवडावयाचा असल्यास कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी 0231-2644325, 9404458714, 9822207812 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.