कोल्हापूर,
दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर महानगरपालिकेच्या द्वारकादास कोटणीस
आयसोलेशन हॉस्पीटल येथील महापालिकेने अल्पावधीतच नुतनीकरण केलेल्या रुग्णालयाचे
उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी
डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले,
यावेळी पश्चिम
महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर
आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी
अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
कोरोना पॉझीटीव्ह
रुग्णांना तात्काळ उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने अल्पावधीतच 59 लाख रुपयाच्या निधीतून आयसोलेशन रुग्णालयाचे
नुतनीकरण केले. यामध्ये 69 बेड उपलब्ध आहेत. महानगरपालिकेने 13 लाख स्वनिधी तसेच
जिल्हा नगरोत्थानमधून 46 लाख निधी खर्च करण्यात आला आहे. तर रोटरी मुव्हमेंटने 12
लाख खर्च करुन व्हेंटीलेटर, बेड, स्ट्रेचर, व्हिलचेअर, स्क्रॅच कार्ड आणि ऑक्सीजनची
सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याठिकाणी 4 आयसीयू बेड, 15 ऑक्सीजन स्पेशल रुम तर 50
रुमचा ऑक्सीजन जनरल वॉर्ड सुरु करण्यात आला आहे. यात महिलासांठी 25 बेड व
पुरुषांसाठी 25 बेडच्या वार्डचा समावेश आहे.
यावेळी उपमहापौर संजय
मोहिते, नगरसेवक दिलीप पोवार, अजित
ठाणेकर, संदीप कवाळे, भूपाल शेटे, सचिन पाटील, नगरसेविका ललिता बारामते, अतिरिक्त
आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ.कृष्णा केळकर,
रोटरी क्लब अध्यक्ष सूर्यकांत पाटील-बुध्दीहाळकर, रोटरी क्लब प्रांतपाल संग्राम
पाटील, रोटरी क्लब माजी अध्यक्ष ऋषीकेश केसकर, रोटरी मुव्हमेंट ऑफ कोल्हापूर माजी
उप प्रांतपाल एस.एस.पाटील, रोटरी सनराईज माजी अध्यक्ष शिशीर शिंदे, श्रीकांत
झेंडे, गिरीष जोशी, सचिव चंदन मिरजकर, माजी सचिव निवास जोशी व आशपाक आजरेकर आदी
उपस्थित होते.
-----------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.