सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

उद्योगांना 15 टक्के ऑक्सीजन पुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील पाच ऑक्सीजन उत्पादन व साठा करणाऱ्या आस्थापनांनी उत्पादित होणारा ऑक्सीजन दिनांक 25 ते 29 ऑगस्ट अखेर एकूण उत्पादीत होणाऱ्या ऑक्सीजन पैकी  15 टक्के ऑक्सीजन हा औद्योगिक वापरासाठी देण्यात यावा. दिनांक 30 ऑगस्ट ते  ०३ सप्टेंबर अखेर एकूण उत्पादीत होणाऱ्या ऑक्सीजन पैकी २० टक्के ऑक्सीजन हा औद्योगिक वापरासाठी देण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.     

        पर जिल्ह्यातील व परराज्यातील वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा पूर्वी प्रमाणे सुरु ठेवावा. औद्योगिक वापरासाठी ऑक्सीजन पुरवठा केल्याने  जिल्ह्यातील वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सीजन उपलब्धतेत कमारता येत आहे. तर त्या प्रमाणात औद्योगिक वापराचा पुरवठा नियंत्रित करावा.

            जिल्ह्यातील पाच ऑक्सिजन उत्पादन व साठा करणाऱ्या आस्थापना व्यवस्थापनासहीत अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऑक्सीजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनाच्या ठिकाणी अधिनिस्त अधिकारी / कर्मचारी यांची तीन शीप्ट मध्ये पूर्ण वेळ नेमणूक करावी. निर्देशाचे पालन संबंधीत आस्थापना यांच्याकडून काटेकोरपणे होते अगर कसे याबाबत देखरेख करण्यासाठी  आवक व जावक नोंदी ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निर्देश दिले आहेत.

 

  00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.