कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): महाराष्ट्र
राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बीज
भांडवल, थेट कर्ज योजना, वैयक्तिक व्याज परतावा आणि गट व्याज परतावा योजनेचा पात्र
लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार
यांनी केले आहे.
सन 2020-2021 या आर्थिक
वर्षासाठी या महामंडळाकडील विविध योजना राबविण्यासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यानुसार
या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. यांमध्ये 20 टक्के बीज भांडवल योजनेसाठी बॅक/ महामंडळामार्फत
कमाल 5 लाखापर्यंत वित्त पुरवठा केला जाणार आहे. थेट कर्ज योजनेला महामंडळामार्फत
कमाल 1 लाखापर्यंत, वैयक्तिक व्याज परतावा योजनेसाठी बॅकेमार्फत कमाल 10 लाख आणि गट
व्याज परतावा योजनेसाठी बॅकेमार्फत कमाल 50 लाखापर्यंत वित्त पुरवठा केला जाणार
आहे. 20 टक्के बीज भांडवल आणि थेट कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांनी ऑफलाईन तर
वैयक्तिक व्याज परतावा आणि गट व्याज परतावा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत.
ऑफलाईन योजनेसाठीचे अर्ज जिल्हा कार्यालयात
उपलब्ध आहेत. अर्ज मिळणेसाठी फक्त संबंधित अर्जदाराने जात प्रमाणपत्र आणि आधार
कार्ड मुळ प्रत घेऊन स्वत: जिल्हा कार्यालयात येणे आवश्यक आहे. ऑनलाईन योजनेसाठी
पोर्टल ओपन असून www.msobcfdc.org या
संकेतस्थळावर “व्याज परतावा योजना” हा पर्याय निवडावा व प्रस्ताव ऑन लाईन सादर करावा.
अपलोड केलेली सर्व कागदपत्रे ही मुळ असावीत. झेरॉक्स चालणार नाहीत. अधिक
माहितीसाठी www.msobcfdc.org या
संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, विचारे माळ, ताराराणी चौकाजवळ, कोल्हापूर,
दुरध्वनी क्रमांक 0231-2653512 येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा
व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.