बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

आजअखेर 8 हजार 579 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर,दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 70 प्राप्त अहवालापैकी 842 निगेटिव्ह तर 217 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (5 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 6 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1 हजार 22 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 864 तर 158 पॉझीटिव्ह (110 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 228 पॉझीटिव्ह आले असे एकूण 603 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 16 हजार 282 पॉझीटिव्हपैकी 8 हजार 579 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 7 हजार 240 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 603  पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-8, भुदरगड-14, चंदगड-3, गडहिंग्लज-8, हातकणंगले-66, कागल-24, करवीर-63, पन्हाळा- 10, राधानगरी- 7, शाहूवाडी-16, शिरोळ- 46, नगरपरिषद क्षेत्र- 151, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 181 व इतर शहरे व राज्य 6 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-272, भुदरगड- 349, चंदगड- 467, गडहिंग्लज- 414, गगनबावडा- 38, हातकणंगले-1753, कागल- 304, करवीर-1760, पन्हाळा- 503, राधानगरी- 406, शाहूवाडी- 419, शिरोळ- 806, नगरपरिषद क्षेत्र-3357, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-5034 असे एकूण 15 हजार 882 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 400 असे मिळून एकूण 16 हजार 282 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 16 हजार 282 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 8 हजार 579 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 463 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 7 हजार 240 इतकी आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.