कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना विषाणू बाधित रुग्णांना वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी खासगी रुग्णालय अधिग्रहण करण्यात व रुग्णालयासाठी वैद्यकीय तज्ञ डॉक्टर फिजिशियन इतर वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्काळ अधिग्रहित करून रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अधिकार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना प्रदान करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
रुग्णालयांसाठी वैद्यकीय तज्ञ (डॉक्टर
फिजिशियन व इतर वैद्यकीय कर्मचारी परिचारीका इत्यादी) यांच्या सेवा तात्काळ अधिकृत
करण्याबाबत अधिकार जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांना
त्यांच्या कार्यक्षेत्रपुरते व त्यांचे अधिकार क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये सर्व
सुविधा उपलब्ध करून करण्याकरिता प्रदान करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी आवश्यकतेप्रमाणे
आदेशाचे पालन न करणाऱ्या अवमान करणाऱ्या व्यक्ती विरुध्द कारवाई व फौजदारी गुन्हे
दाखल करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालय वैद्यकीय तज्ञ डॉक्टर फिजिशियनस इतर
वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच
भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असेही
आदेशात नमुद आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.