कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा
माहिती कार्यालय) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 गावांमधील 1709 व्यक्तींचे व 16
जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
स्थलांतरीत कुटुंबांची
तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे करवीर तालुक्यातील बाधित 2 गावातील 1510 व्यक्तींना
सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
चंदगड
तालुक्यातील बाधित 1 गावातील 41 कुटुंबातील 184 व्यक्ती 16 जनावरांचे स्थलांतर
करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 8 कुटूंबातील 15 नागरिकांचे
स्थलांतरीत करण्यात आले आहे.
अशा
जिल्ह्यातील एकूण 4 गावांमधील 1709 व्यक्तींना आणि 16 जनावरांना सुरक्षित ठिकाणी
स्थलांतरीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 1 संक्रमण शिबीरात 15 जण
कोल्हापूर शहरात 1 ठिकाणी
उघडण्यात आलेल्या संक्रमण शिबीरात 5 पुरुष 9 महिला तर 1 लहान मुल अशा 15 जणांचा
समावेश आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.