शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

शिवाजी तंत्र विद्यालयात 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देणे सुरु

 


 

कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय): शिवाजी तंत्र विद्यालय केंद्र, लक्ष्मीपुरी या संस्थेत इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश देणे सुरु आहे. ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजीसाठी प्रत्येकी 30 जागा उपलब्ध असल्याचे शिवाजी तंत्र विद्यालय केंद्र तथा औद्योगिक शाळेचे मुख्याध्यापक व्ही. व्ही. राजगुरु यांनी कळविले आहे.  

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कंपनी मध्ये ऍप्रेटींसशिप मिळू शकते तसेच इयत्ता 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग डिप्लोमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो. तसेच विद्यार्थ्यांस शासनाकडून संस्थेमार्फत या व्यवसायाचे व्यवसाय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या अभ्यासक्रमासाठी शासकीय नियमानुसार अत्यंत अल्प फी असून शासकीय शिष्यवृत्तींचा लाभ घेता येतो. तसेच इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संस्थेशी सकाळी 11 ते 5 या वेळेत व अधिक माहितीसाठी 0231-2644325, 9404458714, 9423043096 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.