कोल्हापूर, दि.
19 (जिल्हा माहिती कार्यालय) : सार्वजनिक व
घरगुती गणेश मुर्तींचे दिनांक 21 व 22 ऑगस्ट रोजी आगमन मिरवणुकीने होत असल्याने
शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी कुंभार गल्ली व बापट कॅम्प या
ठिकाणावरुन गणेश मुर्ती मोठ्या प्रमाणात खरेदी करुन मिरवणुकीने घेवून जाण्यासाठी
नागरिक मोटार वाहनांनी येत असतात. मिरवणूका सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख
यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१चे कलम ३४ अन्वये दिनांक २१ व २२ ऑगस्ट रोजी शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी
कुंभार गल्ली व बापट कॅम्प येथील खालील नमूद मार्ग मोटार वाहनांना वाहतुकीस बंद व
खुले करण्याचे निर्देश दिले आहेत.
• प्रवेश बंद करण्यात आलेले
मार्ग खालीलप्रमाणे :
शाहूपुरी कुंभार गल्ली :
१. शाहूपुरी, कुंभार गल्लीमध्ये जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (
अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून ) नाईक अॅंन्ड नाईक कंपनी समोर प्रवेश बंद करण्यात
येत आहे. बालाजी डिजीटल येथून कुंभार गल्लीमध्ये जाणाऱ्या सर्व प्रकारच्या
वाहनांना प्रवेश बंद करणेत येत आहे
२. फोर्ड कॉर्नर व उमा टॉकीज दिशेने येवून शाहूपुरी, कुंभार गल्लीमध्ये
जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून ) रिलायन्स
मॉल कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
३. पार्वती सिग्नल चौक व उमा टॉकीज दिशेने येवून शाहूपुरी, कुंभार
गल्लीमध्ये जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ( अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून ) आयर्विन
ख्रिश्चन हायस्कुल या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
४. गवत मंडई चौकातून कुंभार गल्लीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक
सेवेतील वाहने वगळून ) गवत मंडई चौकात प्रवेश बंद करण्यात येत आहे.
५. पार्वती टॉकीज सिग्नल येथून गवत मंडईकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनाखेरीज
सर्व प्रकारच्या वाहनांना
(अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) पार्वती सिग्नल येथे प्रवेश बंद करण्यात
येत आहे.
पार्किग व्यवस्था:
१. शाहुपूरी भागातून घरगुती गणपती घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी आपली
वाहने गवत मंडई ते पार्वती टॉकीज रोडवर एका बाजूस रहदारीस अडथळा होणार नाही. अशा
प्रकारे पार्क करावीत तसेच शाहुपुरी गल्ली नं ४ व ५ मधील रोडवर एका बाजूस रहदारीस
अडथळा होणार नाही अशा प्रकारे पार्क करावीत.
2. लक्ष्मीपुरी, राजारामपुरी भागातुन घरगुती गणपती घेण्यासाठी येणाऱ्या
भाविकांनी आपली वाहने आर्यविन ख्रिश्चन ग्रांउन्डवर पार्क करावीत किंवा रिलायन्स
मॉल अगर नाईक ॲन्ड नाईक कंपनी येथून प्रवेश करावा. चारचाकी वाहन धारकांनी वाहने
रस्त्याच्या एका बाजूस रहदारीस अडथळा होणार नाही अशा प्रकारे पार्क करावीत.
नो पार्किंग :-
गवत मंडई येथील श्री नाईकनवरे यांच्या
निवासस्थान जवळील कॉर्नर चौकापासून सर्व बाजूस ५० मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या
मोटार वाहनाना नो पार्किंग करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून)
पापाची तिकटी कुंभार गल्ली :
१. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गंगावेशकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व
प्रकारचे वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून ) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
२. पापाची तिकटी ते बुरुड गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारचे
वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून ) पापाची तिकटी या ठिकाणी प्रवेश बंद
करण्यात येत आहे.
३. शाहू उद्यान गंगावेश ते कुंभार गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व
प्रकारचे वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून ) शाहू उद्यान या ठिकाणी
प्रवेश बंद करण्यात येत आहे.
४. जोशी गल्ली ते पापाची तिकटीकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारचे
वाहनांना (अत्यावश्यक सेमेतील वाहने वगळून ) जोशी गल्ली या ठिकाणी प्रवेश बंद
करण्यात येत आहे.
पार्किग व्यवस्था:
वाहनांना पार्किगसाठी गंगावेश ते पापाची तिकटी ते पान लाईन तसेच चप्पल लाईन
सोईनुसार जागा उपलब्ध करुन दिली जाईल.
नो पार्किग :- गंगावेश चौक ने पापाची तिकटी ते माळकर चौक या
मार्गावर वाहन उभे करण्यास मनाई
करण्यात येत आहे.
बापट कॅम्प :
१. शिरोली टोल नाका ते बापट कॅम्प कडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या
वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून ) शिरोली टोल नाका येथे प्रवेश बंद
करण्यात येत आहे. वाहने मार्केट यार्ड चौक येथून जाधववाडी मार्गे पुढे मार्गस्त
होतील.
सर्व मार्ग हे दिनांक २१ते २२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ०७.०० वाजले पासून सार्वजनिक
व घरगुती श्री.गणेश मुर्तींचे आगमन होईपर्यंत सर्व मोटार वाहनांना प्रवेश बंद
करण्यात येत आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.