रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

आजअखेर 6 हजार 906 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 

आजअखेर 6 हजार 906 जणांना डिस्चार्ज

                                            -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

   कोल्हापूर,दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 729 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 500 निगेटिव्ह तर 209 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (2 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 18 अहवाल नाकारण्यात आले) अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 609 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 501 तर 108 पॉझीटिव्ह (39 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 265 पॉझीटिव्ह आले असे एकूण 582 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 14 हजार 737 पॉझीटिव्हपैकी 6 हजार 906 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 7 हजार 426 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 582 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, भुदरगड-9, चंदगड-4, गडहिंग्लज-14,गगनबावडा-1, हातकणंगले-21, कागल-19, करवीर-79, पन्हाळा- 5, राधानगरी-6, शिरोळ- 26, नगरपरिषद क्षेत्र- 97, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-252 व इतर शहरे व राज्य 46 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-246, भुदरगड- 309, चंदगड- 454, गडहिंग्लज- 379, गगनबावडा- 32, हातकणंगले-1525, कागल- 270, करवीर- 1593, पन्हाळा- 474, राधानगरी- 373, शाहूवाडी- 385, शिरोळ- 714, नगरपरिषद क्षेत्र-3033, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-4620 असे एकूण 14 हजार 407 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 330 असे मिळून एकूण 14 हजार 737 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 14 हजार 737 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 6 हजार 906 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 405 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 7 हजार 426 इतकी आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.