कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील
राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी
मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे
सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर
तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच
शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद, बाचणी बंधाऱ्यावर पाणी
आल्याने शिरोली दुमालाकरिता पर्यायी मार्ग कसबा बीड, शिरोली घानवडे प्रजिमा 29
पासून तसेच बाचणीकरिता सडोली पासून वाहतुक सुरू, इस्फूर्ली, नागाव, खेबवडे, बाचणी
मार्गे वाहतुक सुरू. महे पुलावर पाणी आल्याने सांगरूळ, आमशी, कसबा बीड व प्रजिमा 29 मार्गे
वाहतुक सुरू, कोगे बंधाऱ्यावर पाणी आल्याने कुडित्रे करिता गगनबावडा मार्गे व कोगे
करिता बालिंगा पाडळी कोगे मार्गे वाहतुक सुरू.
हातकणंगले
तालुक्यातील इचलकरंजी नवीन
पुलावरुन वाहतूक सुरू, निलेवाडी- पारगाव पुलावर पाणी आल्याने अमृतनगर,चिकोर्डे
मार्गे वाहतुक सुरू.
गगनबावडा
तालुक्यातील शेणवडे, अणदूर, धुंदवडे रस्त्यावर पाणी आल्याने
अणदूर,मांडूकली, वेतवडे मार्गे वाहतुक सुरू, प्रजिमा क्र. 19 वर पाणी आल्याने पर्यायी
मार्ग नसल्याने वाहतुक बंद.
शिरोळ
तालुक्यातील शिरढोण पुलावर
पाणी आल्याने नांदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु.
कागल
तालुक्यातील सर पिराजीराव
तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी,
मुरगुड मार्गे वाहतूक सुरु. बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी आल्याने अनुर ते बानगे मार्गे
वाहतूक सुरु.
पन्हाळा
तालुक्यातील बाजारभोगाव गावाजवळ
रस्त्यावर पाणी आल्याने पोहाळे-पोहाळेवाडी व मलकापूर, येळवण, मांजरे,
अणुस्कुरामार्गे वाहतुक सुरू, करंजफेण रस्त्यावर पाणी आल्याने मलकापूर, येळवण,
जुगाई, अनुस्कूरामार्गे वाहतुक सुरू, केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण
रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू, गोठे पुलावर पाणी आल्याने मल्हारपेठे, सुळे, कोदवडे
मार्गे वाहतुक सुरू, काखे पुलावर पाणी आल्याने वाहतुक बंद, माजगाव पुलावर पाणी
आल्याने कळे, पुनाळ, दिगवडे मार्गे वाहतूक सुरू.
चंदगड
तालुक्यातील इब्राहिमपूर
पुलावर पाणी आल्याने कनुर गवसे मार्गे वाहतूक सुरु, चंदगड पुलावर पाणी आल्याने पाटणे फाटा, पाटणे, मोटणवाडी मार्गे वाहतुक
सुरू, दाटे गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने आमरोली,
सोनारवाडी मार्गे वाहूक सुरु, करंजगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद. प्रजिमा क्र.62
मार्गावर पाणी आल्याने वाहतुक बंद, म्हालेवाडी,नित्तूर सीडी वर्कवर, कोवाड गावाजवळ
तसेच काणूर व गवसे गावाजवळ पाणी आल्याने पर्यायी मार्ग नसल्याने वाहतुक बंद.
गडहिंग्लज तालुक्यातील निलजी बंधाऱ्यावर पाणी आल्याने दुंडगे, जरळी,
मुंगळी, नुल मार्गे वाहतूक सुरु. येणेचवंडी कॉजवेवर पाणी आल्याने नुल, भडगाव,
बेरडवाडी, नरेवाडी, नंदनवाड मार्गे वाहतुक सुरू, हलकर्णी कॉजवेवर पाणी आल्याने बसरगे,
येणेचवंडी, नंदनवाड, हलकर्णी मार्गे वाहतूक सुरु.
राधानगरी तालुक्यातील शिरगाव बंधाऱ्यावर
पाणी आल्याने तारळे, राशिवडे मार्गे
वाहतूक सुरु.
शाहूवाडी तालुक्यातील कानसा नदीवरील मालेवाडी
पुलावर पाणी आल्याने तुरूकवाडी, मलकापूर,निळे, भेंडवडे, उदगीरी, राघूचा वाडा,
शित्तुर, उखळू मार्गे वाहतुक सुरू. वारणा नदीवरील आरळा शित्तुर पुलावर पाणी आल्याने
तुरूकवाडी, कोकरूड, शेडगेवाडी, आरळा मार्गे वाहतुक सुरू.
आजरा तालुक्यातील साळगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने ओडीआर 139
सोहाळे, बाची, आजरा सुतगिरणीमार्गे वाहतूक सुरू.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.