बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

ऑक्सीजन उत्पादक कंपन्या अधिग्रहीत -जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी CCC/DCHC /DHC कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. कोव्हिड रुग्णांवर उपचार करणेसाठी CCC/DCHC /DHC या ठिकाणी ऑक्सीजन पुरवठा करणारी सक्शन यंत्रणा व पाईपलाईन करण्यात आलेली आहे. कोविड संसर्ग झालेल्या रुग्णांवर वैद्यकीय उपचारा दरम्यान ऑक्सीजन उपलब्ध करुन देणे अत्यंत आवश्यक असल्याने जिल्हयातील ऑक्सीजन उत्पादक आस्थापना मार्फत ऑक्सीजन प्राप्त करुन घेवुन CCC/DCHC /DHC व जिल्ह्यातील सर्व रुग्णालये याठिकाणी वैद्यकीय वापरासाठी देण्याबाबत ऑक्सीजन पुरवठा सुरळीत राहणे आवश्यक असलेने सदर ऑक्सीजन उत्पादक आस्थापना अधिग्रहीत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

 दिनांक 19 ऑगस्ट पासून जिल्ह्यात कार्यन्वित असणाऱ्या खाली नमूद केलेल्या ऑक्सीजन उत्पादन व साठा करणाऱ्या आस्थापना व्यवस्थापनासहीत पुढील आदेश होईपर्यंत अधिग्रहीत करण्यात येत आहे.

  

अ.क्र.

आस्थापनेची नांव व पता

अधिकृत अधिकारी नांव व संपर्क क्रमांक

1.

कोल्हापूर ऑक्सीजन व ॲसिटिलीन प्रा. लि., कागल एमआयडीसी रोड, कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, तळसंदे,   ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर - 416236.

श्री. देसाई, प्रॉडक्शन हेड,

मोबा. क्र. 8308521400

2.

के इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि., डी-30, शिरोली एमआयडीसी, कोल्हापूर

श्री. योगेंद्र चौधरी,

मोबा क्र. 9881491680

3.

मे. महालक्ष्मी गॅसेस, सेक्टर जे/1, प्लॉट नं. 3 ते 11, पार्वती को-ऑप इंडस्ट्रीयल इस्टेट‍ लि., यड्राव, इचलकरंजी - 416146.

श्री. अमर तासगावे,

मोबा क्र.9021897896

4.

मे. चंद्रा उद्योग, 603/2, शिरोली एमआयडीसी, कोल्हापूर 416122

श्री. रोहन राजेंद्र घाटगे,

मोबा क्र. 8149957172

5.

मे. देवी इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि., प्लॉट नं. एच-10, गोकुळ‍ शिरगांव एमआयडीसी, कोल्हापूर

श्री. अनिल पाटील,

मोबा क्र. 9372272282

आस्थापनांनी खाली दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.

1) उपरोक्त आस्थापना मधील उत्पादीत होणारा ऑक्सीजन, उपलब्ध साठा व बाहेरुन आणला जाणारा सर्व वैद्यकीय ऑक्सीजनचा साठा, आस्थापनेचे व्यवस्थापनासहीत अधिग्रहित करण्यात येत आहे. सदर ऑक्सीजन पुढील आदेश होईपर्यंत औद्योगिक कारणासाठी पुरवठा करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. परंतु ज्या औद्योगिक आस्थापनांमध्ये वैद्यकीय उपकरणे उत्पादीत होतात, अशा उद्योगांना या आदेशात नमुद सक्षम प्राधिकाऱ्याचे लेखी पूर्व परवानगीने रुग्णालयांची गरज पूर्ण झालेवर उर्वरित ऑक्सीजन पुरवठा / विक्री करता येईल.

2) उपरोक्त आस्थापनांनी त्यांचे उत्पादन पूर्ववत पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ सुरु ठेवणेचे असुन आस्थापनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाही या आदेशाने अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या आस्थापना मधील व्यवस्थापन, उत्पादन, मार्केटींग व इतर आवश्यक कामांसाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नियमित आस्थापनांमध्ये नियमित सेवा देण्याची आहे. यात हलगर्जीपणा केल्यास किंवा असे अधिकारी व कर्मचारी कामावर गैरहजर राहत आहेत किंवा उत्पादन क्षमतेपेक्षा कमी होत आहेत, ऑक्सिजनचा पुरवठा वैद्यकीय कारणासाठी / रुग्णालयांना न होता विना परवाना अन्य ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्ती भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 या कायद्याखाली फौजदारी कारवाईस पात्र राहतील.

3) ज्या आस्थापनांकडे वैद्यकीय ऑक्सीजन उत्पादन व विक्री करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता नाही, त्यांनी तात्काळ मान्यता प्राप्त करुन घ्यावयाची आहे किंवा ज्या आस्थापनांकडे सद्यस्थितीत अशी मान्यता आहे, त्यांचे वैद्यकीय दृष्ट्या औक्सीजन योग्य असल्याचे प्रमाणपत्र घेणेचे आहे. यासाठी त्वरीत संबंधीत सक्षम प्राधिकाऱ्यांकडे त्याप्रमाणे विनंती अर्ज करुन त्यास मान्यता घेण्याची आहे.

4) उपरोक्त आस्थापनांनी त्यांचे आस्थापनात उत्पादीत होत असलेल्या ऑक्सीजन पुरवठा प्राधान्याने कोल्हापूर जिल्हा व त्यानंतर नजीकच्या जिल्ह्यातील इतर रुग्णालयांना करणे बंधन कारक आहे.

5) उपरोक्त आस्थापनांनी परराज्यातील औद्योगिक किंवा रुग्णालयांना होणारा सर्व प्रकारचा ऑक्सिजन पुरवठा तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

6) ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सर्व आस्थापनांनी कोणत्याही परिस्थीतीत सध्या किंवा कोव्हिड संसर्गापूर्वी असलेल्या ऑक्सिजन दरामध्ये वाढ करण्याची नाही. असे निदर्शनास आल्यास संबंधीत आस्थापना विरुध्द कारवाई केली जाईल.

7) उक्त नमुद आस्थापना यांनी वैद्यकीय कारणाशिवाय अन्य उद्योगांसाठी ऑक्सीजनचा पुरवठा करणेचा असलेस त्याबाबत प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, कोल्हापूर व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर यांचे पुर्व लेखी परवानगी शिवाय करणेचा नाही.

8) प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, कोल्हापूर व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर यांचे अधिनस्त नियुक्त कर्मचारी यांना उक्त नमुद आस्थापना यांनी ऑक्सीजन उत्पादन, पुरवठा व वाटपाबाबतची संपूर्ण माहिती देणेची आहे.

आदेशातील निर्देशांची अंमलबजावणी करण्याकरीता खालील अधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून प्राधिकृत करणेत येत आहे.

 

अ.क्र.

प्राधिकृत अधिकारी

क्षेत्र

1)

श्री. धनाजी इंगळे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, कोल्हापूर

मोबा. क्र. 9923222381.

कोल्हापूर जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्र

2)

श्री.  सतिश शेळके, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, कोल्हापूर, मोबा. क्र. 9423839512.

एमआयडीसी क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्र

        अधिकाऱ्यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांना आपले कार्यक्षेत्रातील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनेच्या ठिकाणी तीन शीफ्ट मध्ये पूर्ण वेळ नेमणूक करावी. आदेशातील दिलेल्या निर्देशांचे पालन संबंधीत आस्थापना यांच्याकडून काटेकोरपणे होते अगर कसे याबाबत देखरेख करावी.  त्याबाबतच्या आवक व जावक नोंदी स्वतंत्र रजिस्टर मध्ये अद्यावत ठेवणेच्या आहेत. (सोबत ऑक्सीजन नोंद रजिस्टर नमुना जोडणेत येत आहे.)

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेव भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.