कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) :
येथील सीपीआरमधील प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामाध्यमातून
कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेड आणि रुग्णांवरील उपचाराबाबत माहिती उपलब्ध होणार
आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी सीपीआरमध्ये सीसीटीव्ही
बसविण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात
आले असून याची पाहणी पालकमंत्री महोदय, अधिष्ठाता, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी
अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रुम याठिकाणी करता येणार आहे. या
सीसीटीव्हीमुळे कुठल्या ठिकाणी किती बेड उपलब्ध आहेत हे समजणार आहे. या रुग्णांची
तपासणी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार होतात की नाही हेही समजणार आहे. सीपीआरमधील
तज्ञ डॉक्टरांना देण्यात आलेल्या सेवेनुसार ते रुग्णांना तपासत आहेत का हेही
समजणार आहे. सीसीटीव्हीमुळे रुग्णांना चांगली सुविधा मिळणार आहे, असेही
जिल्हाधिकारी म्हणाले.
0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.