शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशाकरिता वेळापत्रक जाहीर

 


कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय): औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 2020 सत्राकरिता एकूण 31 व्यवसांकरिता सुधारित ऑनलाईन प्रवेश प्रकिया वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन ITIAdmissionPortal:https://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

प्रवेश अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन भरण्याबाबत व प्रवेशाबाबत कार्यवाही चालू झाली आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्रवेश अर्ज भरले असतील अशा उमेदवारांना अर्जातील माहितीमध्ये बदल करावयाचा असेल तर संकेतस्थळावर इडिट ऑप्शन चालू करण्यात आलेला आहे. प्रवेश अर्ज भरलेल्या उमेदवारांनी पुढील सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांचा पासवर्ड जतन करून ठेवणे आवश्यक आहे. प्रवेश एकूण सहा प्रवेश फेऱ्यांमध्ये होतील. शासकीय आयटीआय कोल्हापूर येथे प्रवेशाकरिता मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा लाभ सर्व उमेदवारांनी घेवून प्रवेशासाठी बिनचूक व्यवसाय विकल्प सादर करण्याचा लाभ घ्यावा.

     या संस्थेत एकूण 31 व्यवसाय असून एक वर्ष मुदतीचे एकूण 15 व्यवसाय आहेत. दोन वर्ष मुदतीचे एकूण 16 व्यवसाय आहेत. चालू वर्षी दोन्ही मिळून एकूण 1364 जागा भरल्या जाणार आहेत. संस्थेची माहिती युट्युब च्या  https://youtu.be/DiWffmwLAmE या लिंकवर उपलब्ध आहे. व्हिडीओचे नाव ITI KOLHAPUR ADMISSION असे आहे.

प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी त्याप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे.

00000

 

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.