Updated : 4 P.M.
जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु
कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील
राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी
मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर सार्वजनिक
बांधकाम (दक्षिण)विभागाचे समन्वय अधिकारी यांनी दिली.
करवीर तालुक्यातील बालिंगे शिंगणापूर रामा-194 केटीवेअर रस्त्यावर पाणी
आल्याने वाहतूक बंद. बाचणी साके सावर्डे प्रजिमा 42 बाचणीबंधाऱ्यावर पाणी आल्याने इस्पुर्ली-नागाव मार्गे
वाहतूक सुरू.
कागल
तालुक्यातील सर पिराजीराव
तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने हासुर, बोळावी, ठाणेवाडी व देवगड, राधानगरी, मुरगुड
मार्गे वाहतूक सुरु. बिद्री सोनाळी बस्तवडे
प्रजिमा 46 बस्तवडे बंधाऱ्यावर पाणी
आल्याने इजिमा 189 अनुर मार्गे वाहतूक सुरू.
पन्हाळा
तालुक्यातील बालिंगे शिंगणापूर रामा-193 बाजार भोगाव येथे पाणी आल्याने पोहाळेवाडी व
मलकापूर यळवण मांजरे अनुस्कुरा मार्गे वाहतूक सुरू. केर्ली
जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू. परखंदळे
आकुर्डे हारपवडे गवशी प्रजिमा 39 गोठे
पुलावर पाणी आल्याने मल्हारपेठ सुळे कोदवडे मार्गे वाहतूक सुरू. वाघबीळ माले काखे
रस्ता प्रजिमा 9 काखे पुलावर पाणी आल्याने
वाहतूक बंद.
चंदगड
तालुक्यातील चंदगड, इब्राहिमपूर,
खानापूर रामा-201 इब्राहिम पुलावर पाणी आल्याने कनुर गवसे मार्गे वाहतूक सुरू.
कोल्हापूर परिते, भेडशी रामा-189 चंदगड पुलावर पाणी आल्याने रामा 180 ते पाटणे
फाटा मोटणवाडी मार्गे वाहतूक सुरू. गुडवळे, खमदळे सावर्डे, हलकणी प्रजिमा 71 करंजगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद.
राजगोळी, कागणी प्रजिमा 65 कडलगे येथे पाणी आल्याने वाहतुक बंद. पाटणेफाटा,
माणगाव, निट्टूर कोवाड प्रजिमा 67 निट्टूर गावाजवळ मोरीवर पाणी आल्याने ढोलगरवाडी
ते करे कुंडी नागरदले प्रजिमा 68 ते किणी कोवाड मार्गे वाहतूक सुरू.
हातकणंगले
तालुक्यातील बोरपाडळे
इचलकरंजी रामा-192 इचलकरंजी जुन्या पुल बंद पर्यायी नवीन पुलावरून वाहतूक सुरू. निलेवाडी
पारगांव प्रजिमा 96 पुलावर पाणी आल्याने अमृतनगर चिकूर्डे मार्ग वाहतूक सुरू.
गगनबावडा
तालुक्यातील शेणवडे अणदूर
धुंडवडे प्रजिमा 34 रस्त्यावर पाणी आल्याने अणदूर मांडुकली वेतवडे मार्गे वाहतूक
सुरू.
आजरा
तालुक्यातील नवले
देवकाडगांव साळगाव प्रजिमा 58 साळगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने इजिमा 139 सोहाळे
मार्गे वाहतूक सुरू.
गडहिंग्लज तालुक्यातील निलजी,नूल,येणेचवंडी प्रजिमा 86 निलगी
बंधाऱ्यावर पाणी आल्याने दुंडगे प्रजिमा 80 मार्गे वाहतूक सुरू.
शाहुवाडी
तालुक्यातील तुरूकवाडी
गोंडोली मालेवाडी प्रजिमा 3 मालेवाडी पूलावर पाणी आल्याने तुरूकवाडी मलकापूर निळे
मार्गे वाहतूक सुरू. आरळा, शित्तूर, राघूचावाडी,उदगिरी प्रजिमा 1 आरळा-शित्तूर पूलावर
पाणी आल्याने तुरूकवाडी मार्गे वाहतूक सुरू.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.