सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

नदीकाठ व सकल भागात राहणाऱ्या लोकांना दक्षतेचा इशारा

 


 

कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय): पंचगंगा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होईल. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी असून आज सायं. 7 पर्यंत ही पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या व सकल भागात राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी, असा इशारा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी तथा सहाय्यक अभियंता शशांक शिंदे यांनी दिला आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.