शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

11 ते 17 ऑक्टोबर कालावधीत आंतरराष्ट्रीय बालिका सप्ताह

 


कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवामार्फत बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी बढाओ या योजनेंतर्गत दि. 11 ते 17 ऑक्टोबर हा सप्ताह आंतरराष्ट्रीय बालिका सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

या सप्ताहामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 11 ऑक्टोबर रोजी जिल्हा/ तालुका / प्राथमिक/ माध्यमिक शाळा/ अंगणवाडी/ प्राथमिक आरोग्य केंद्र/  उपकेंद्र स्तरावर बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. 12 ऑक्टोबर रोजी बेटी बचाओ बेटी पढाओचे तालुका / प्राथमिक/ माध्यमिक शाळा/ अंगणवाडी/ प्राथमिक आरोग्य केंद्र/ उपकेंद्र स्तरावर प्रभातफेरी, रॅली सामाजिक अंतर ठेवून मास्क वापरून आयोजन तसेच ऑनलाईन पोस्टर, घोषवाक्य, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी तालुका / प्राथमिक/ माध्यमिक शाळा/ अंगणवाडी/ प्राथमिक आरोग्य केंद्र/ उपकेंद्र स्तरावर मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, मुलींच्या नावे वृक्षारोपन करणे, मुलींच्या जन्माचा दाखला वाटप, बेबी केअर किट वाटप, ताराराणी, प्राधान्य कार्ड, माझी कन्या भाग्यश्री ठेवपावतींचे वितरण करणे.

14 ऑक्टोबर रोजी गाव स्तरावर अंगणवाडी सेविका, आशा, मदतनीस यांनी समाजातील मुलींचे महत्व गृहभेटीव्दारे समजावून सांगणे. तालुका/प्राथमिक/ माध्यमिक शाळा/ अंणवाडी/ प्राथमिक आरोग्य केंद्र/ उपकेंद्र स्तरावर मुली, महिलांसाठी शासकीय योजना, कायदे याबाबत मार्गदर्शन व्हीडिओ ऑनलाईन पाठविणे. बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत बालक-पालक सभा आयोजित करून ½ मुलींवर शस्त्रक्रीया केलेल्या पालकांचे मनोगत 30 सेकंद व्हिडीओ संदेश, व्हॉट्स ॲपव्दारे पाठवणे.  15 ऑक्टोबर रोजी बेटी बचाओ बेटी पढाओचा जागरूकता निर्माण करण्यासाठी नुक्कड, नाटक, पथनाट्य, चित्रपट, कार्यक्रम, कठपुतळी कार्यक्रम, स्थानिक वाहिनी, एफएम रेडीओ इ. संदेश मोबाईलवरून पाठवणे. आरोग्य आणि पोषण, पीसी व पीएनडीटी आणि एमपीटी कायदा तसेच इतर महिला संबंधित कायदे यांचे लहान व्हिडीओ/ माहिती मोबाईलवरून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणे.

16 ऑक्टोबर रोजी तालुका / प्राथमिक/ माध्यमिक शाळा/ अंगणवाडी स्तरावर फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन तसेच बेटी बचाओ बेटी पढाओचा ऑडीओ संदेश 20 सेकंद CDPO, पर्यवेक्षिका, सेविका यांनी स्वत:च्या आवाजात व्हॉटस् ॲपवर पाठविणे. 17 ऑक्टोबर रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत तालुका/ अंगणवाडी स्तरावर स्थानिक चॅम्पियन्स/ ब्रॅड ॲम्बेसिडर मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टिने उल्लेखनीय कामकाज केलेल्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक नेते, तळागाळातील कार्यकर्ते, सर्वोकृष्ट शाळा व्यवस्थापन समिती, क्रीडा/ शैक्षणिक/ सांस्कृतिक क्षेत्रात यशस्वी कामगिरी केलेल्या मुली इ. चा सत्कार आयोजित करणे, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहामध्ये करण्यात आले आहे.

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.