कोल्हापूर दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय)
:- अनुकंपा तत्वावरील वर्ग-3 व वर्ग-4 मधील
उमेदवारांची सामायिक सुची kolhapur.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली
आहे. सदर यादी संबधित उमेदवारांच्या निर्देशनास
आणून त्याबाबत त्यांची दिनांकित स्वाक्षरीची पोहोच व त्यांचे हरकती/ दुरुस्ती
असल्यास त्याबाबत हरकत अर्जाचे प्रतीसह 30 ऑक्टोबर पर्यत अहवाल जिल्हाधिकारी
कार्यालयास सादर करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी कळविले
आहे सर्व शासकीय कार्यालयाकडून
प्राप्त झालेल्या अनुकंपा उमेदवारांच्या माहितीच्या अनुषंगाने आज अखेरची सर्व
शासकीय कार्यालयाची मिळून एकत्रित यादी करण्यात आली आहे. त्यानुसार शासन निर्णय क्र.
अकंपा-1217/प्र.क्र. 102/आठ दि. 21.9.2017 मधील दिलेल्या प्रतिक्षासूची नमूना
परिशिष्ट-ड मध्ये अनुकंपा तत्वावरील वर्ग-3 व वर्ग -4 च्या उमेदवारांची सामायिक
सूची तयार करण्यात आली आहे. अनुकंपा तत्वावरील वर्ग-3 व वर्ग -4 मध्ये ज्या उमेदवारांना
नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत व ज्यांचे
वय 45 वर्षापेक्षा जास्त झाले आहे, अशा
उमेदवारांची नावे सामायिक सूचीतून वगळण्यात आलेली यादी नमूना परिशिष्ट-ड मध्ये
तयार करण्यात आली असल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी दिलेल्या
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, 00000 |
|
|||
|
|
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.