गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

ऑटोरिक्षा वयोमर्यादेत वाढ ऑटोरिक्षा धारकांना सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनोखी भेट - प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस

 


    कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने कोरोना पार्श्वभूमीवर 16 वर्षे  वयाची मर्यादा दि. 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली होती.  राज्य शासनाने किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निर्णय घेतल्यास लागू होईल असे ठरविण्यात आले होते. राज्य परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षा धारकांना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व ऑटोरिक्षा धारकांना असलेल्या अडचणींचा विचार करुन कोल्हापूर सह ग्रामीण भागासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या परिचलन बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी कळविले आहे.

            मुंबई व्यतिरिक्त क्षेत्रांमध्ये ऑटोरिक्षाकरिता सुधारित वयोमर्यादा वर्ष व गणनेचा दिनांक पुढील प्रमाणे दि. 1 ऑगस्ट 2021 पर्यंत 20 वर्षे, दि. 1 ऑगस्ट 2022 पर्यंत 18 वर्षे, दि. 1 ऑगस्ट 2023 पर्यंत 16 वर्षे व दि. 1 ऑगस्ट 2024 पर्यंत 15 वर्षे अशी सुधारित वयोमर्यादा आहे.

            प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई, सदस्य तथा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेवून ऑटोरिक्षा धारकांना एक अनोखी भेट दिली आहे. ऑटोरिक्षा संघटनांनी निर्णयाचे स्वागत करुन प्राधिकरणाचे आभार मानले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.