कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा
माहिती कार्यालय) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब
माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या
सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 4199 घरांचे आणि 18510 इतक्या लोकांची सर्व्हेक्षण करण्यात आले,
असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’
या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची
कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती चंदगड 2845 घरांचे व 12768 नागरिकांचे, व
शिरोळ- 334 घरांचे व 1336 नागरिकांचे असे एकूण 3179 घरांचे व 14104 नागरिकांचे
सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
नगरपंचायत शिरोळ 513
घरांचे व 2108 नागरिकांचे, नगरपंचायत कुरुंदवाड 72 घरांचे व 312 नागरिकांचे तर
नगरपंचायत जयसिंगपूर 127 घरांचे व 551
नागरिकांचे, असे एकूण 712 घरांचे व 2971 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
तर कोल्हापूर शहरातील 308 घरांचे तर 1435 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.