कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा
माहिती कार्यालय) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब
माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत दुसऱ्या फेरीच्या सर्व्हेक्षणाचे आज 52012 घरांचे आणि
232807 इतक्या लोकांचे सर्व्हेक्षण
करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’
या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची
कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती आजरा 3573
घरांचे व 13360 नागरिकांचे, भुदरगड 7581 घरांचे व 30045 नागरिकांचे, चंदगड 2969 घरांचे व 11605 नागरिकांचे, हातकणंगले 8615 घरांचे व 39963 नागरिकांचे, करवीर 1041 घरांचे व 4562 नागरिकांचे, कागल 5721 घरांचे व 24993 नागरिकांचे, पन्हाळा 2947
घरांचे व 13418 नागरिकांचे, राधानगरी 4936 घरांचे व 24554 नागरिकांचे, शाहूवाडी 2073
घरांचे व 8593 नागरिकांचे व शिरोळ- 7488
घरांचे व 33573 नागरिकांचे असे एकूण 46944 घरांचे व 204166 नागरिकांचे सर्व्हेक्षण
करण्यात आले आहे.
नगरपंचायत
इचलकरंजी 3570 घरांचे व 18739 नागरिकांचे, नगरपंचायत पेठवडगाव 250 घरांचे व 4036 नागरिकांचे तर नगरपंचायत
हुपरी 745 घरांचे व 3557 नागरिकांचे, नगरपंचायत
शिरोळ 436 घरांचे व 2090 नागरिकांचे, नगरपंचायत जयसिंगपूर 67 घरांचे व 219 नागरिकांचे, असे एकूण 5068 घरांचे व 28641 नागरिकांचे
सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.