कोल्हापूर, दि. 9
(जिल्हा माहिती कार्यालय): नवरात्री, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या काळामध्ये
सायंकाळच्या मर्यादित वेळेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढून संसर्ग वाढण्याची
शक्यता असल्याने ही गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील
सर्व व्यपारी आस्थापना/दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) यांना रात्री 9 वाजेपर्यंत सुरु
ठेवण्यास परवानगी दिल्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.
जिल्ह्यातील
लॉकडाऊनची मुदत दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत वाढविण्यात
आलेली आहे. जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनांकडून नवरात्री, दसरा, दिवाळी या
सणासुदीच्या काळामध्ये सायंकाळच्या मर्यादित वेळेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
वाढून संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने अशी गर्दी टाळण्यासाठी व्यापारी आस्थापनांची
संध्याकाळची वेळ रात्री 9 वाजेपर्यंत वाढविण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे.
त्यानुसार
अशी गर्दी टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी आस्थापना / दुकाने (अत्यावश्यक
सेवा वगळून) रात्री 9 वा. पर्यंत सुरु ठेवणेस परवानगी देण्यात येत आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय
दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन
अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई
करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.