बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

मोडीलिपी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र नेण्याचे आवाहन

 


          कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : पुराभिलेख संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाची परीक्षा 7 डिसेंबर 2019 रोजी झाली. या परीक्षेचा निकाल यापूर्वीच जाहीर करण्यात आला असून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. मोडीलिपी प्रशिक्षण परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रे कोल्हापूर पुरालेखागार, हुजूर रेकॉर्ड इमारत, टाऊन हॉल बागेसमोर येथून कार्यालयीन वेळेत येवून घेऊन जावीत, असे आवाहन पुरालेखागारचे सहाय्यक संचालक बा.ना.कुंडले यांनी केले आहे.

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.