गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

जिल्हा परिषदेमध्ये हात धुवा दिन साजरा

 


         कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय):  जिल्हा परिषदेमध्ये 15 ऑक्टोबर या जागतिक हात धुवा दिनानिमित हात धुण्याचे महत्व, हात धुण्याची पद्धती या विषयी माहितीपट दाखविण्यात येऊन हा दिन साजरा करण्यात आला.

          जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये आज हात धुण्याबाबतच्या पद्धतीच्या फलकाचे अनावरण करून प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन  मित्तल, बांधकाम समिती  सभापती हंबीरराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, प्रियदर्शिनी मोरे, सोमनाथ रसाळ, आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कार्यकारी अभियंता विजय कांडगावे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम आदी उपस्थित होते. 

 मे. सुलभ इंटरनॅशनल सोशल  सर्व्हिस ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने श्री. प्रवीण पवार यांनी जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना हात धुण्याच्या योग्य पद्धतीबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. यावर आधारित माहितीपटही यावेळी दाखविण्यात आला. या माहितीपटाच्या माध्यमातून हात धुण्याचे महत्व, हात धुण्याची पद्धती याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. 

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.