सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

तिन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सप्ताहाचा शुभारंभ

 


   कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी 2 वाजता सर्कीट हाऊस येथील राजश्री शाहू सभागृहामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमाचा शुभांरभ होणार आहे.

कार्यक्रमास खासदार संजय मंडलीक, खासदार धैर्यशिल माने, आमदार चंद्रकांत जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच अध्यक्ष बजरंग देसाई, उपाध्यक्ष सतीश पाटील, महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती पद्माराणी पाटील, आरोग्य व बांधकाम विभागाचे सभापती हंबीरराव पाटील, अर्थ व शिक्षण विभागाचे सभापती प्रवीण यादव तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हेही उपस्थित राहणार आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.