सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

माझे कुटुंब माझी जबाबदारी आज 61372 नागरीकांचे सर्व्हेक्षण - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

 


कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत  कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 14279 घरांचे आणि 61372 इतक्या लोकांची  सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

                 ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती हातकणंगले 3645 घरांचे व 15854 नागरिकांचे तर शाहूवाडी- 122 घरांचे व 544 नागरिकांचे असे एकूण 3767 घरांचे व 16398 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

               नगरपंचायत इचलकरंजी 6137 घरांचे व 27741 नागरिकांचे, नगरपंचायत कागल 77 घरांचे व 320 नागरिकांचे तर नगरपंचायत जयसिंगपूर  152 घरांचे व 663 नागरिकांचे, असे एकूण 6366 घरांचे व 28724 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर कोल्हापूर शहरातील 4146 घरांचे तर 16250 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.