कोल्हापूर दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) :- भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने
सतर्क भारत-समृध्द भारत” ही संकल्पना घेवून जिल्ह्यात दि. 27 ऑक्टोबर ते 2
नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी
माहिती लाचलुचत प्रतिबंध विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
केन्द्रीय दक्षता आयोग,नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार या सप्ताहाचे
आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुशंगाने राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या
नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय, प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत
उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फत सप्ताहाचे आयोजन कोविड-१९ चा
प्रादुर्भाव असलेने महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकान्वये
सामाजिक अंतर,मास्क वापरणे इत्यादी अटीचे पालन करून कार्यक्रम पार करण्याचे
निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार
सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था
स्वायत्त संस्थामार्फत २७ ऑक्टोबर रोजी ११ वाजता सर्व शासकीय कार्यालयामध्ये
भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेणेत येणार आहे. शपथ घेतल्यानंतर राज्यपाल
महोदयांनी सप्ताह निमित्त दिलेला संदेश
उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईल.
भ्रष्टाचारा
विरुध्द जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. यामध्ये आकाशवाणी, वृत्तपत्रे,केबल चॅनेल, व्हॉटस अप ग्रुप व यु
टयुब या प्रसार माध्यमांच्या मदतीने जनजागृती, नागरिकांना लाचेच्या तक्रारी देण्याविषयी
आवाहन करणे, भ्रष्टाचाराविरूध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाच्या कार्यपध्दती विषयीची माहिती पत्रकांचे वाटप करणे, जिल्हयातील सर्व
प्रमुख शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर, रिक्षा,एसटी व रेल्वे स्टॅंड, त्याचप्रमाणे
शहरातील विविध दर्शनी भागामध्ये टोल फी क. १०६४ व मोबाईल अॅप बाबतची स्टिकर व
बॅनर्स लावले जाणार आहेत.
याबरोबरच
स्वयंसेवी संघटना, अशासकीय संघटना, सेवाभावी संस्था, स्वातंत्र सैनिक, स्त्री
संघटना, वाहन चालक मालक संघटना, कामगार संघटना, एम.आय.डी.सी. येथील
कारखानदारांच्या कार्यालयास भेटी देवून त्यांना शासकीय योजनेचा लाभ घेताना काही
अडचणी येतात अगर कसे ? या बाबत संस्थेचे प्रतिनिधी यांचे समवेत चर्चा करुन
त्यांचेकडे लाचेची मागणी होते काय या बाबत विचारपूस करणे, जुन्या
सापळा कारवाई झालेल्या केसेसमधील तक्रारदार व जागृत नागरिक यांच्याशी संपर्क साधून
त्यांच्या तक्रारींविषयी माहिती घेण्यात येईल.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.