कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती
कार्यालय) : राज्यात सन 2016 च्या मृग बहारापासून
पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शासनाने 2020 ते 2023
या तीन वर्षासाठी मृग बहारासाठी संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू व लिंबू या सहा
फळपिकांसाठी व (आंबिया बहार) द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा,काजू व प्रायोगिक
तत्वावर स्ट्रॉबेरी या आठ पिकांकरीता पीक विमा लागू करण्यात आला असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत-जास्त
शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी
केले आहे.
जिल्ह्यासाठी
द्राक्ष, केळी, आंबा व काजू ही पिके व काही निवडक महसूल मंडळ अधिसूचित करण्यात
आलेली आहेत.
नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीने तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य करणे, ही या योजनेची उद्दिष्टये
आहेत.
ही योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळापिकांसाठी आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतक-यास 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणीची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण कवच लागू राहाणार आहे. त्यासाठी पिकनिहाय उत्पादनक्षम वय निश्चित करण्यात आले आहे. (आंबा-5 वर्षे, काजू -5 वर्ष,
द्राक्ष-2 वर्ष)
ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत.
जिल्ह्यामधील केळी,आंबा, द्राक्ष, काजू या पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या पिकांना पिकनिहाय निश्चित करून देण्यात आलेल्या कालावधीमध्ये अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान, गारपीट, वेगाचा वारा,जादा तापमान या कारणामुळे विमा संरक्षण कालावधीत नुकसान झाल्यास विम्यापोटी नुकसान भपाईचा लाभ मिळणार आहे.
एचडीएफसी एग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पहिला मजला, एचडीएफसी हाऊस,165-166 बॅकबे रिक्लॅमेशन,एच.टी
पारेख मार्ग,चर्चगेट, मुंबई- 400020. फोन नं.022-66383600 या विमा कंपनीकडून ही
योजना कोल्हापूर जिल्ह्यासाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत नमूद पिकासाठी विमा सरंक्षित रक्कमेच्या 5 टक्के वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल
ती रक्कम हप्ता म्हणून देय राहील. विमा संरक्षित रक्कम व हप्ता खालील प्रमाणे राहील.
(प्रति हेक्टरी रक्कम रुपये)
अ. क्र. |
पिकांचे नाव |
विमा संरक्षित रक्कम हेक्टरी |
विमा
कंपनीने दिलेला विमा दर |
विमा दरात शेतकरी हिस्सा |
केंद्राचा हिस्सा |
राज्य हिस्सा |
एकूण विमा हप्ता |
1 |
द्राक्ष(ब) |
320000 |
25.00 |
16000 |
32000 |
32000 |
80000 |
2 |
केळी |
140000 |
25.00 |
7000 |
14000 |
14000 |
35000 |
3 |
आंबा |
140000 |
25.00 |
7000 |
14000 |
14000 |
35000 |
4 |
काजू |
100000 |
45.00 |
5000 |
12500 |
27500 |
45000 |
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी
विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत समान असेल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार
कर्जदार/बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आणि बँकानी कर्जदार/बिगर
कर्जदार शेतकऱ्यांचे प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे याबाबतची अंतिम मुदत
याप्रमाणे-
आंबिया
बहार सन 2020-21
अ.क्र. |
फळपिक |
अंतिम तारीख |
शेरा |
1 |
द्राक्ष |
15 आक्टोंबर 2020 |
कर्जदार व बिगर
कर्जदार शेतक-यांनी योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे/शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा
अंतिम दिनांक |
2 |
केळी |
31 आक्टोंबर 2020 |
|
3 |
काजू |
30 नोव्हेंबर 2020 |
|
4 |
आंबा |
31 डिसेंबर 2020 |
आंबिया बहार सन 2020-21 करीता अधिसुचित करण्यात आलेली फळपिकनिहाय महसूल
मंडळे याप्रमाणे-
फळपिक |
तालुका |
अधिसुचित मंडळ |
द्राक्ष (एकूण 5 ) |
हातकणंगले |
हातकणंगले, वडगांव (2) |
शिरोळ |
नांदणी, जयसिंगपूर, नृसिंहवाडी (3) |
|
केळी (एकूण 59) |
हातकणंगले |
हातकणंगले,वडगांव, हेरले (3) |
शिरोळ |
शिरोळ,दत्तवाड,नृसिंहवाडी, नांदणी, जयसिंगपूर(5) |
|
पन्हाळा |
कोडोली,बाजारभोगाव,कोतोली,वाडी रत्नागिरी, पडळ, कळे(6) |
|
राधानगरी |
आवळी बु. ,कसबा तारळे,राधानगरी,सरवडे, क.वाळवे, राशीवडे
बु.(6) |
|
गगनबावडा |
गगनबावडा, साळवण (2) |
|
करवीर |
कसबा बावडा, निगवे दु, सांगरूळ, शिरोली दु,बीड, बालिंगा,
हळदी, इस्पुर्ली, कणेरी, मुडशिंगी (10) |
|
कागल |
सिध्दनेर्ली, केनवडे,खडकेवाडा,मुरगुड,कापशी,कागल(6) |
|
गडहिंग्लज |
गडहिंग्लज,महागांव,नेसरी,कडगांव,हलकर्णी ,कसबा नुल (6) |
|
भुदरगड |
कडगांव,करडवाडी, पिंपळगांव, गारगोटी, कुर(5) |
|
आजरा |
आजरा,उत्तुर,मलिग्रे,गवसे (4) |
|
चंदगड |
चंदगड,कोवाड,नागनवाडी,माणगाव, तुर्केवाडी, हेरे.(6) |
|
काजू (एकूण 27) |
शाहुवाडी |
आंबा, करंजफेन, भेडसगांव, मलकापूर (4) |
राधानगरी |
राधानगरी,कसबा तारळे,राशिवडे बु.(3) |
|
गगनबावडा |
गगनबावडा, साळवण (2) |
|
कागल |
कापशी (1) |
|
गडहिंग्लज |
महागाव, नेसरी (2) |
|
भुदरगड |
कडगांव,करडवाडी, पिंपळगांव, गारगोटी, कुर(5) |
|
आजरा |
आजरा,उत्तुर,मलिग्रे,गवसे (4) |
|
चंदगड |
चंदगड, कोवाड, नागनवाडी,माणगाव, तुर्केवाडी, हेरे.(6) |
|
आंबा (एकूण 45) |
पन्हाळा |
कोडोली, बाजारभोगाव, कोतोली, वाडी रत्नागिरी, पडळ, कळे(6) |
शाहूवाडी |
बांबवडे, सरूडआंबा, करंजफेन, भेडसगांव, मलकापूर (6) |
|
राधानगरी |
आवळी बु. /कसबा तारळे/राधानगरी/सरवडे/क.वाळवे/राशीवडे
बु.(6) |
|
गगनबावडा |
गगनबावडा, साळवण (2) |
|
करवीर |
सांगरूळ, हळदी,
इस्पुर्ली, कणेरी, (4) |
|
कागल |
कागल, सिध्दनेर्ली, केनवडे, खडकेवाडा, मुरगुड, कापशी,
(6) |
|
भुदरगड |
कडगांव, करडवाडी, पिंपळगांव, गारगोटी, कुर(5) |
|
आजरा |
आजरा, उत्तुर, मलिग्रे, गवस (4) |
|
चंदगड |
चंदगड,कोवाड,नागनवाडी, माणगाव, तुर्केवाडी, हेरे.(6) |
अधिक
माहितीसाठी शेतकऱ्यांनी सर्व संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी, वित्तीय संस्था, ग्रामस्तरावरील
कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय
कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. वाकुरे यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.