गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

माझे कुटुंब माझी जबाबदारी आज 358197 नागरीकांचे सर्व्हेक्षण - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

 


कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत  दुसऱ्या फेरीच्या सर्व्हेक्षणाचे आज 84848 घरांचे आणि 358197 इतक्या लोकांचे  सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

                 ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती  आजरा 3543 घरांचे व 14618 नागरिकांचे, भुदरगड 5228 घरांचे व 20577 नागरिकांचे,  चंदगड 4685 घरांचे व 13640 नागरिकांचे,  गडहिंग्लज 21733 घरांचे व 87951,  नागरिकांचे, गगनबावडा 625 घरांचे व 3445 नागरिकांचे, हातकणंगले 3788 घरांचे व 14269 नागरिकांचे,  करवीर 8032 घरांचे व 35321 नागरिकांचे, पन्हाळा 6632 घरांचे व 31265 नागरिकांचे, राधानगरी 4273 घरांचे व 18798 नागरिकांचे, शाहूवाडी 4746 घरांचे व 17948 नागरिकांचे  व शिरोळ- 8062 घरांचे व 36676 नागरिकांचे असे एकूण 71347 घरांचे व 294508 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

               नगरपरिषद गडहिंग्लज 1035 घरांचे व 4029 नागरिकांचे,  इचलकरंजी 2216 घरांचे व 18015 नागरिकांचे, पेठवडगाव  300 घरांचे व 1505 नागरिकांचे,

मुरगुड 38 घरांचे व 150 नागरिकांचे, पन्हाळा 45 घरांचे व 354 नागरिकांचे, शिरोळ 357 घरांचे व 1859 नागरिकांचे, कुरुंदवाड 86 घरांचे व 445 नागरिकांचे, जयसिंगपूर  258 घरांचे व 1088 नागरिकांचे,  असे एकूण 4335 घरांचे व 27445 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

        कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 9166 घरांचे व 36244 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.