सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

नवरात्रोत्सव व विजयादशमी उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


 

कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) :  श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व विश्वस्त, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, कोल्हापूर यांनी दिनांक 25 ऑक्टोबर  रोजी दसरा चौकात होणारा शाही दसरा व विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम कोव्हिड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी-टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील इतर नागरी व ग्रामीण भागात नवरात्रीच्या निमित्ताने होणारे विविध कार्यक्रम व विजयादशमी दिवशी होणारे कार्यक्रमाबाबत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  निर्गमित केला आहे..

            कोल्हापूर शहर, इतर सर्व नागरी व ग्रामीण भागात दि. 19 ऑक्टोबर पासून खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहेत.

            कोल्हापूर शहर व परिसरात नवरात्री कालावधीत तसेच दसरा चौक व शहरात दिनांक 25 ऑक्टोबर रोजी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक धार्मिक, विजयादशमीचे सोने लुटणे, सिमोल्लंघन इ. गर्दीचे कार्यक्रम करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

            जिल्ह्यातील इतर नागरी व ग्रामीण भागातही नवरात्री कालावधीत व विजयादशमी दिवशी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक धार्मिक, विजयादशमी, सिमोल्लंघन, सोने लुटणे इ. गर्दीचे कार्यक्रम करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

            जिल्ह्यात नवरात्रीचे कालावधीत व विजयादशमी दिवशी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांचे व उत्सवाचे स्वरुप वैयक्तीक व घरगुती राहील.

            यापूर्वी अध्यक्ष, देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांना या कालावधीतील धार्मिक कार्यक्रमासाठी दिलेली परवानगी प्रमाणे कार्यवाही करावी, परंतु कोणत्याही परिस्थितीत अशा कार्यक्रमांचे वेळी नागरिकांची गर्दी होणार नाही याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे व कार्यक्रमाचे स्वरुप प्रातिनिधिक राहील याची दक्षता घेणे बंधनकारक राहील.

            आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद आहे.        

 

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.