कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा
माहिती कार्यालय): ज्या रुग्णांना कोव्हिड- 19 चा संसर्ग झालेला
आहे, अशा रुग्णांची
चार लक्षणांच्या समुहाच्या आधारे क्षयरोगाची तपासणी
करण्यात येणार आहे. चार लक्षणांच्या समुह जसे २ आठवाड्यापेक्ष्या जास्त
कालावधीचा खोकला, ताप, वजनामध्ये घट अशी लक्षणे असणाऱ्या कोव्हिड रुग्णांची तपासणी
एक्स रे आणि सीबीनेटद्वारे क्षयरोग निदान करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा
क्षयरोग अधिकारी डॉ. ऊषादेवी कुंभार यांनी दिली.
सर्व क्षयरुग्णांची कोव्हिड- 19
साठी तपासणी करण्यात येणार आहे. क्षयरोग -कोव्हिड द्विदिशात्मक तपासणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र
सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत. सारी अथवा ईली रुग्णांचींही क्षयरोगासाठी तपासणी
करण्यात येणार आहे. क्षयरोग -कोव्हिड द्विदिशात्मक म्हणजे कोव्हिड १९ रुग्णांची
क्षयरोग निदानासाठी तपासणी करणे तर क्षयरुगांची कोव्हिड १९ निदानासाठी तपासणी करणे. वेगवेगळ्या अभ्यासात कोव्हिड- १९ च्या रुग्णांत क्षयरोगाचे प्रमाण
०. ३७ - ४.४७% असल्याचे आढळून आले आहे. क्षयरोग असलेल्या व्यक्तींमध्ये २. १ पट गंभीर कोव्हिडचा धोका असतो. क्षयरोग व कोव्हिड 19 या दोन्ही समस्यांचे
निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे .
क्षयरोग कोव्हिड 19 सहरोगी व्यवस्थापनासाठी क्षयरोगाच्या आरोग्य सुविधा व कोव्हिड
19 विलगीकरण सुविधामध्ये दुवा तयार करण्यात येणार आहे. क्षयरोग असलेले सर्व कोव्हिड रुग्ण आजाराच्या गंभीरतेनुसार समर्पित कोव्हिड काळजी केंद्र /समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्र /समर्पित कोव्हिड रुग्णालयात भरती करण्यात येणार आहे.
नवीन निदान झालेल्या किंवा सध्या उपचाराखाली असलेल्या सर्व
क्षयरुग्णांची कोव्हिड 19 साठी तपासणी करण्यात येणार आहे . कोव्हिड 19 चाचणी पॉझिटीव्ह
आली तर त्या रुग्णांस विना विलंब क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमानुसार उपचार करण्यात येणार आहे.जिल्ह्यामध्ये कोव्हिड
निगेटीव्ह रुग्णांमधून एकूण ४० क्षयरुग्णांचे निदान झाले आहे. तर सारी व ईली
निगेटीव्ह रुग्णांमधून ९ क्षयरुग्णांचे निदान झाले आहे. तीव्र श्वसन संक्रमण आजार सारी व
इन्फ्लूएंझा सारख्या आजार ईली असणाऱ्या सर्व रुग्णांची उपरोक्त चार लक्षणांच्या समुह जसे २ आठवाड्यापेक्ष्या जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनामध्ये घट इत्यादी लक्षणे असल्यास अशा रुग्णांची तपासणी एक्स रे आणि सीबीनेटद्वारे
क्षयरोग निदानासाठी करण्यात येणार आहे. ही तपासणी करण्यासाठी विविध अधिकारी व
कर्मचाऱ्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे.
कोव्हिड 19 रुग्णांच्या क्षयरोग तपासणीकरिता तसेच क्षयरुग्णांच्या कोव्हिड 19 निदाना साठी जिल्ह्यामध्ये सीबीनेट मशीन, बायोसेफ्टी
कॅबिनेटसह बसविण्यात आले आहे. एकाच वेळी कोव्हिड बाधित संशियित क्षयरुग्णांची कोव्हिड
19 साठी तपासणी करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध आहे. याचा फायदा जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे.
सी.पी. आर. च्या कृष्णा बिल्डिंगमध्ये वैद्यकीय
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग तपासणीसाठी बाह्यरुग्ण तपासणी सेवा व निदानासाठी
सीबीनेट सुविधा सुरु आहेत. याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहनही डॉ. कुंभार
यांनी केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.