गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

माझे कुटुंब माझी जबाबदारी आज 66803 नागरीकांचे सर्व्हेक्षण - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

 


कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत  कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 13575 घरांचे आणि 66803 इतक्या लोकांची  सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

                 ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती चंदगड 2711 घरांचे व 13677 नागरिकांचे, गडहिंग्लज 494 घरांचे व 2078 नागरिकांचे, हातकणंगले 268 घरांचे व 1696 नागरिकांचे, कागल 3447 घरांचे व 14589 नागरिकांचे, शाहूवाडी 990 घरांचे व 3368 नागरिकांचे, तर शिरोळ- 361 घरांचे व 8485 नागरिकांचे असे एकूण 8271 घरांचे व 43893 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

               नगरपंचायत पेठवडगाव 36 घरांचे व 242 नागरिकांचे, नगरपंचायत कागल 194 घरांचे व 906 नागरिकांचे तर नगरपंचायत जयसिंगपूर  204 घरांचे व 892 नागरिकांचे, असे एकूण 434 घरांचे व 2040 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर कोल्हापूर शहरातील 4870 घरांचे तर 20870 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.