कोल्हापूर, दि. 02 (जिल्हा माहिती कार्यालय) : देशभरात पोषण माह साजरा करण्यात आला कोरोनाच्या टाळे बंदी च्या
पार्श्वभूमीवरही जिल्ह्यातील सर्व पोषण साथीनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने पोषण
अभियान दारोदारी, घरोघरीच नव्हे तर मनोमनी ही पोहोचविले. जिल्हयाने राज्यात
ऍक्टिव्हिटी राबविण्यात 3 रा आणि लोकसहभागात 4 था क्रमांक आला असल्याची माहिती
जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली.
या अभियानात पुणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक,
नाशिक जिल्ह्याचा द्वितीय क्रमांक तर कोल्हापूर जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आला आहे.
जिल्ह्यातील शाहूवाडीचे आणि करवीर 2, करवीर, कोल्हापूर ग्रामीण, पन्हाळा हे
प्रकल्प सर्वोत्तम 5 आलेत. इतर प्रकल्पांनी ही अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे.
अभियानात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष,
महिला बाल विकास सभापती सर्व समिती सभापती ,जि प ,प स सदस्य ,सर्व स्थानिक
लोकप्रतिनिधी, खाते प्रमुख,गट विकास अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे
त्यांनी सांगितले.
वेगळ्या,
नाविन्यपूर्ण, संदेश आणि संकल्पनांचे राज्यभरात कौतुक अन अनुकरण झाले. तब्बल 79
लाख ऍक्टिव्हिटी घेऊन त्यात तब्बल 6 कोटी लोकसहभाग नोंदवून आम्ही कोल्हापुरी
पोषणात लय भारी ही घोषणा सार्थ करून दाखविली. परंतु माह संपला म्हणून पोषण अभियान
संपले नाही, निरंतर पोषणासाठी नाविन्यपूर्ण कार्य करत राहायचे आहे, या वर्षअखेर
नाविन्यपूर्ण पोषण उपक्रम आणि नोंदी करत यावर्षी देशात नंबर मिळवण्यासाठी प्रयत्न
करणार असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्याचा
राज्यात तिसरा क्रमांक आल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,एन्ट्री
करणाऱ्या सर्व सेविका, मदतनीस, आशा ताई, पर्यवेक्षिका, सर्व पोषण कॉर्डिनेटर, जिल्हा
समन्वयक, समन्वयी विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांनी श्री. रसाळ यांनी आभार मानले.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.