कोल्हापूर, दि. 5
(जि.मा.का.) : जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी ते 18 मार्च
व माध्यमिक शालांत परीक्षा दिनांक 3 मार्च ते 23 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये
परीक्षा केंद्राच्या आवारात /परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता दिनांक 18
फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत (ज्या दिवशी परीक्षेचे पेपर नसतील ते दिवस
वगळून) ज्या ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा घेण्यात येणार आहेत त्या
केंद्राच्या / उपकेंद्राच्या सभोवार 100 मी. परिसरात दररोज सकाळी 7 वा. पासून
सायं. 18 वा. पर्यंत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये मोबाईल फोन बाळगण्यास/ वापरण्यास,
झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन, पेजर व लॅपटॉप वापरावर अप्पर जिल्हादंडाधिकारी भाऊ
गलांडे यांनी बंदी आदेश जारी केला आहे.
हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले
अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी
हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणासाठी लागू राहणार नाही.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.