मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन



        कोल्हापूर, दि. 18 (जि.मा.का.) : केंद्र शासनाने असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लागू केली आहे, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.
            सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने 31 डिसेंबर रोजी असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 पारित केलेला आहे. त्या अनुषंगाने विविध व्यवसाय गट जसे की बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, घरेलू कामगार यासारख्या विविध 127 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लागू करण्याबाबतचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
            या योजनेचा अधिकाधिक  लाभ घेण्यासाठी नोंदीत बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, शाहुपूरी, व्यापारी पेठ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. गुरव यांनी केले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.