बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी शाळेला वाटले डस्टबीन







                कोल्हापूर, दि. 12 (जि.मा.का.) : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज श्री दत्ताबाळ शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगत कचरा वर्गीकरणासाठी शाळेला डस्टबीनचे वाटप केले. श्री दत्ताबाळ मिशन डिव्हाईन संचलित श्री दत्ताबाळ हायस्कूलला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आयुक्तांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयीचे महत्व सांगितले, तसेच विद्यार्थ्यांना प्लास्टिक बंदीबाबत शपथही दिली.
       यावेळी संस्थेच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका पल्लवी देसाई, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, मुकादम सुरेश घाटगे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बालाजी मुंढे यांनी केले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.