कोल्हापूर, दि. 13
(जिमाका) : महाडीबीटी पोर्टल 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता
विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,
अशी माहिती उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक यांनी दिली.
विभागीय सहसंचालक अंतर्गत आतापर्यंत एकूण 40
हजार 957 एवढे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज
करताना ॲडमिशन पावती, पासिंग सर्टीफिकेट/ मार्कशीट, डोमेशिएल दाखला, उत्पन्नाचा
दाखला व रेशन कार्डाची झेरॉक्स प्रत किंवा प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रांची
पुर्तता करावयाची आहे.
विद्यार्थ्यांनी
www.Mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर
ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. महाविद्यालयांमध्ये याबाबत कक्षाची स्थापना करण्यात
आली असून एका प्राध्यापकाची शिष्यवृत्ती समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.