कोल्हापूर,
दि. 1 (जि.मा.का.) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचा
विद्युतपुरवठा
व पाणीपुरवठा खंडीत करण्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशास पुढील
सुनावणीपर्यंत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी
दि. 7 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आली आहे.
कोल्हापूर
जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन
अधिनियम 1999 च्या कलम 10(6) मधील तरतुदीचा भंग केल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी उक्त
अधिनियमाच्या कलम 21(5) मधील तरतुदीनुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ लि. कोल्हापूर या
संस्थेचा बी -1, एम.आय.डी.सी गोकुळ शिरगांव येथील दुग्धप्रक्रीया प्रकल्पाचा तसेच
नागाळा पार्क, कोल्हापूर येथील कार्यालयाचा विद्युतपुरवठा व पाणीपुरवठा दिनांक 1
फेब्रुवारी 2020 पासून खंडीत करण्याचा आदेश 10 जानेवारी 2020 रोजी जारी केला होता.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.