कोल्हापूर, दि. 12 (जि.मा.का.) : सहकार
खात्यामार्फत माहे मे 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा व
सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षेसाठीची दिनांक 15 फेब्रुवारी ते
16 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अमर
शिंदे यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सविस्तर सूचना
विभागाच्या www.mahasahakar.maharashtra.gov.in
व www.sahkarayuct.maharashtra.gov.in
या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
इच्छूक उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in
या वेबसाईट वर सादर करावेत, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.