शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीत सोमवारी लोकशाही दिन


       

कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का.) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील आणि आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
 जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 3 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 12 वाजता राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
या लोकशाही दिनाचा लाभ जिल्हयातील सर्व नागरिकांनी घ्यावा, तसेच शासनाकडील दिनांक 26 सप्टेंबर 2012 रोजीच्या शासनपरिपत्रकान्वये तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. परंतु न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व , अपिल्स, सेवाविषयक ,आस्थापना विषयक बाबी, अंतिम उत्तर दिलेले आहे , देण्यात येणार आहे. अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयात केलेले अर्ज लोकशाही दिनात स्विकृत करण्यात येणार नाहीत, याची सर्व नोंद घ्यावी, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.