कोल्हापूर, दि. 24 (जि.मा.का.) : पोस्ट ऑफिस आणि बँकामध्ये जमा असलेल्या ठेवीदारांच्या दावा न केलेल्या ठेवीच्या
यादी पोस्टाच्या www.indiapost.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली
असल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
पोस्ट ऑफिस आणि
बँकामध्ये जमा असलेल्या ठेवीदारांच्या दावा न केलेल्या ठेवीच्या व्यवस्थापन व
हाताळण्यासाठी भारत सरकारने नियम (ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी नियम 201) अधिसूचित
केले आहेत. या नियमांनुसार अशा खात्यांची माहिती ज्यात रक्कम आहे असे हक्क न
सांगितलेले (10 वर्षाहून अधिक काळ निष्क्रिय किंवा ऑपरेटर न केलेली खाती)
सार्वजनिकरित्या अधिसूचित केली जावीत. त्यानुसार पोस्ट खात्याने www.indiapost.gov.in
या अधिकृत संकेतस्थळावर अशा खात्यांचा तपशील प्रकाशित केला आहे. अधिक माहितीसाठी
स्थानिक पोस्ट ऑफिसशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.