शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

ट्रक टर्मिनलसाठी महापालिकेच्या ताब्यातील जागेचा वापर करावा. . - पालकमंत्री सतेज पाटील








कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : तावडे हॉटेल येथील महापालिकेच्या ताब्यात असणारी जागा  ट्रक टर्मिनलसाठी वापरात आणावी, आशा सूचना पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज दिली.
       ट्रक टर्मिनलसाठी तावडे हॉटेल येथील जागेची, बस टर्मिनलसाठी शिरोली जकात येथील जागेची तसेच व व्हीनस कॉर्नल येथील गाडी अड्डा येथील पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, उप महापौर संजय मोहिते, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.
          पालकमंत्री श्री. पाटील यांनी तावडे हॉटेल येथील ट्रक टर्मिनलची पाहणी केली. यावेळी  23 एकर पैकी तीन ते साडेतीन एकर महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या साडेतीन एकर जागेची साफ सफाई जेबीसीच्या सहाय्याने करावी.  या जागेत असणारे पीक निघाल्यानंतर तीची साफ सफाई करुन जागा वापरात घ्यावी. या जागेवर किमान 100 ट्रक थांबू शकतील. त्यासाठी अनुदान उपलब्ध करुन दिले जाईल. 
          शिरोली जकात नका येथील बस टर्मिनलसाठी असलेली जागा जेसीबी व रोलरने साफ सफाई करुन  घ्यावी व बस टर्मिनलसाठी जागा वापरात आणावी, असे ही ते म्हणाले.
          व्हीनस कॉर्नल येथील गाडी अड्ड्याची पाहणीही त्यांनी केली. येथे काम चालू झाल्यांनतर येथील गाळे धारकांची पर्यायी व्यवस्था 23 एकर जागेत होवू शकते, असेही ते म्हणाले.  
 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.